एक्स्प्लोर
लाईव्ह टीव्हीव्हिडीओशॉर्ट व्हिडीओवेब स्टोरिज्फोटो गॅलरीपॉडकास्टमुव्ही रिव्ह्यू
यूजफुल
होम लोन EMI कॅलक्यूलेटर बीएमआय कॅलक्यूलेटर वय मोजा/ वय कॅलक्यूलेटर एज्युकेशन लोन EMI कॅलक्यूलेटर कार लोन EMI कॅलक्यूलेटर पर्सनल लोन EMI कॅलक्यूलेटर पेट्रोलचे दर डिझेलचे दर
मुख्यपृष्ठकरमणूकParesh Rawal Hera Pheri 3: परेश रावल नेहमीच असं करतात? 2 वर्षांपूर्वी साईन केल्यानंतर सोडलेली अक्षय कुमारची 'ही' फिल्म; मागितलेली दुप्पट फी
Paresh Rawal Hera Pheri 3: परेश रावल यांनी 'OMG ओह माय गॉड'मध्ये धमाकेदार भूमिका साकारली होती.
By : नामदेव जगताप|Updated at : 21 May 2025 11:31 AM (IST)
Paresh Rawal Hera Pheri 3
Source :
ABP MajhaParesh Rawal Hera Pheri 3: अक्षय कुमार (Akshay Kumar), परेश रावल (Paresh Rawal) आणि 'हेरा फेरी 3' (Hera Pheri 3) सध्या चर्चेत आहे. कारणंही तसंच आहे. राजू, श्याम आणि बाबू भैय्या हे त्रिकूट पुन्हा एकदा प्रेक्षकांना खळखळवून हसवण्यासाठी सज्ज झालं होतं. पण बाबू भैय्या फेम परेश रावल यांनी तडकाफडकी चित्रपटातून एग्झिट घेतली. परेश रावल यांच्या निर्णयामुळे खळबळ माजली असतानाच, अक्षय कुमारनं त्यांना तब्बल 25 कोटींची लीगल नोटीस धाडली. हे सर्व जरी खरं असलं तरीदेखील परेश रावल यांनी अक्षय कुमारचा चित्रपट सोडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही परेश रावल यांनी ऐनवेळी माघार घेत अक्षय कुमारला चांगलंच गोत्यात आणलं होतं.
गोष्ट आहे, 'OMG 2'ची. परेश रावल यांनी अक्षय कुमारच्या 'OMG 2' या चित्रपटातूनही माघार घेतली होती. परेश रावल यांनी 'OMG ओह माय गॉड'मध्ये धमाकेदार भूमिका साकारली होती. परेश रावल यांची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडलेली. एवढंच काय तर चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरही धुवांधार कमाई केलेली. पण, ज्यावेळी 'OMG 2' रिलीज झाला, त्यावेळी त्यामध्ये परेश रावल नव्हते. त्यांची जागा पंकज त्रिपाठींनी घेतलेली.
स्क्रिप्ट आवडली नाही... परेश रावल यांचं स्पष्टीकरण
स्क्रिप्टशी संबंधित समस्यांमुळे परेश रावल यांनी 'OMG 2' मधून माघार घेतल्याचं उघड झालं. बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत परेश रावल म्हणाले की, "मला पटकथा आवडली नाही, म्हणून मी त्याचा भाग होऊ इच्छित नव्हतो. पहिल्या भागाचा फायदा घेण्यासाठी सिक्वेल बनवणं मला आवडत नाही, जसं आपण हेरा फेरीच्या बाबतीत केलं" .
ज्यादा फी मागितल्यामुळे मेकर्सची माघार
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जरी परेश रावल यांनी सांगितलं असलं की, OMG 2 ची स्क्रिप्ट आवडली नसल्यामुळे त्यांनी माघार घेतली. तरी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परेश रावल OMG 2 साठी पहिली पसंती होते. मेकर्सनी त्यांच्यासोबत बातचितही सुरु केली होती. पण, अभिनेत्याचं म्हणणं होतं की, त्यांना आपल्या मार्केट वॅल्यूपेक्षा जास्त पैसे मिळाले पाहिजेत. कारण पहिल्या पार्टमध्ये ते लीड रोलमध्ये होते आणि फिल्म सुपरहिट होण्यासाठी कारणीभूत होते. पण, मेकर्सना वाटलं की, परेश रावल यांना जास्त फी दिल्यामुळे बजेट कोलमडेल, त्यामुळे त्यांनी माघार घेतली."
'हेरा फेरी 3'साठीही जास्त पैसे मागितले?
'हेरा फेरी 3'बाबत बोलायचं झालं तर, इथेही फीबाबत काही गोष्टी समोर येत आहेत. सुत्रांच्या म्हणण्यानुसार, परेश रावल यांनी कॉन्ट्रॅक्ट साइन केलेलं आणि सायनिंग अमाउंटही घेतली होती. पण, त्यानंतर मेकर्सकडे त्यांनी जास्त फी मागितली. त्यामुळे त्यांनी फिल्ममधून बाहेरचा रस्ता दाखवला गेला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Paresh Rawal Hera Pheri 3: परेश रावल यांनी अचानक का सोडला Hera Pheri 3? समोर आलं खरं कारण, म्हणाले...
Published at : 21 May 2025 11:31 AM (IST)
Tags :
Akshay Kumar Suniel Shetty Paresh Rawal Hera Pheri 3 ENTERTAINMENT BOLLYWOOD
अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
#Indian-Pakistan Ceasefire# Operation Sindoor update# india attack pakistan
Advertisement
व्हिडीओ
फोटो गॅलरी
ट्रेडिंग पर्याय
एबीपी माझा वेब टीम
Blog : पालकत्वाची नवी परीक्षा: मोबाईलच्या दुनियेत मुलांना सावरताना
Opinion